Konkana Sen | ‘मला सिगारेटचं…’; कोंकणा सेनने सांगितला आयुष्यातील कठीण काळ

Jan 11, 2024 - 14:54
 0  29
Konkana Sen | ‘मला सिगारेटचं…’; कोंकणा सेनने सांगितला आयुष्यातील कठीण काळ
Konkana Sen | ‘मला सिगारेटचं…’; कोंकणा सेनने सांगितला आयुष्यातील कठीण काळ

Konkana Sen | मेट्रो, आजा नचले, तलवार, लाइफ इन मेट्रो, लिपस्टिक अंडर माय बुरखा अशा चित्रपटात झळकलेली अभिनेत्री कोंकणा सेन (Konkana Sen) सध्या ‘वेक अप सिड 2’ च्या सिक्वेलमुळे चर्चेत आहे. अभिनेता रणबीर कपूर आणि तीचा ‘वेक अप सिड’ हा चित्रपट प्रचंड हिट झाला होता. या दोघांची जोडी तब्बल 14 वर्षांनी एका जाहिरातीत दिसून आली आहे. त्यामुळे चाहत्यांकडून ‘वेक अप सिड 2’ चा सिक्वेल येणार असल्याचे अंदाज बांधले जात आहेत.

कोंकना ‘वेक अप सिड’ मुळे चर्चेत असतानाच तिने केलेल्या एका मोठ्या खुलास्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कोंकणाने आयुष्यातील सर्वांत कठीण काळाचा उल्लेख करत मोठे विधान केले आहे. चित्रपट सृष्टीत अनेक मोठ्या चित्रपटाचा भाग असतानाही एका सवयीमुळे तिला फार त्रास झाल्याचे तीने सांगितले.

konkna sen ला आहे स्मोकिंगची प्रचंड सवय

कोंकणाने मनमोकळेपणाने या गोष्टीचा खुलासा केला. “मला स्मोकिंग करायची वाईट सवय आहे आणि आता मला ही सवय मोडायची आहे. हळूहळू माझी हि सवय कमी होतीये. पण, आता मला पूर्णपणे माझी स्मोकिंगची सवय मोडायची आहे.”, असे कोंकणा(Konkana Sen)म्हणाली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow