उद्धव ठाकरेनंतर शरद पवारांच्या पक्षाबाबत टिकटिक सुरू!
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आणि आमदार अपात्रता प्रकरणावर काल (१० जानेवारी) निकाल दिला.सभापती राहुल नार्वेकर यांनी प्रदीर्घ निर्णयाचे वाचन करत एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना असल्याचे त्यांनी निकालात सांगितले.या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.पक्षाची घटना, संघटनात्मक बांधणी आणि बहुसंख्य आमदार-खासदार यांचा त्या मागचा आधार असल्याचे त्यांनी नमूद केले.शिवसेनेच्या निकालानंतर आता शरद पवारांचे टेंशन वाढले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे चिन्ह कोणत्या गटाकडे जाईल याची धाकधूक त्यांना लागल्याची माहिती आहे.
मूळची खरी शिवसेना अखेर एकनाथ शिंदे यांची ठरली.सभापतींच्या निर्णयानंतर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. अशीच परिस्थिती शरद पवार गट आणि अजित पवार गटाची होणार आहे.राष्टवादी पक्ष आणि पक्षाचे चिन्ह कोणत्या गटाकडे जाईल याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.राष्ट्रवादी नेमकी कोणाची तसेच राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह नेमकं कोणाला मिळणार याबाबतचा निवडणूक आयोगातील निकाल कोणत्याही क्षणी येऊ शकतो.हा निकाल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येऊ शकतो नंतर निकाल अद्याप आलेला नाही. निकाल आल्यानंतर राष्ट्रवादी चिन्ह आणि पक्ष नेमका कुणाचा? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
What's Your Reaction?