महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 !!

Dec 27, 2025 - 15:01
 0  12
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 !!

दैनिक जागर मराठी

 
अकोला (प्रतिनिधी) : अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 अनुषंगाने अकोला महानगरपालिका क्षेत्रात मतदान जनजागृती करण्यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.सुनिल लहाने यांच्या आदेशान्वये तसेच मनपा अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने यांच्या मार्गदर्शनात 8 जनजागृती चित्ररथाव्दारे अकोला महानगरपालिका क्षेत्रात मतदार जनजागृती कार्यक्रमाचे मनपा उपायुक्त विजय पारतवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 अन्वये अकोला महानगरपालिका प्रशासनाव्दारा जनजागृतिपर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून या आगोदर अकोला महानगरपालिकेच्या 127 कचरा घंटा गाड्यांवर मतदार जनजागृती बाबतचे फलके आणि ध्वनीफीत (जिंगल) लावून संपुर्ण महानगरपालिका क्षेत्रात जनजागृती करण्यास सुरूवात झाली असून आजपासून अकोला मनपा प्रशासनाव्दारा फलके आणि ध्वनीफीत (जिंगल) लावून तयार करण्यात आलेले 8 चित्ररथव्दारे मतदार जनजागृती करण्यात येणार असून या रथांचे मनपा उपायुक्त पारतवार यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. अकोला महानगरपालिकेची होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शहरातील प्रत्येक मतदारांनी आपले मतदानाचा हक्क बजावून या लोकशाही महोत्सवात सहभागी होऊन आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडाण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा निवडणुक अधिकारी डॉ.सुनिल लहाने यांनी केले आहे. यावेळी मनपा उपायुक्त विजय पारतवार शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी, मतदार जनजागृती हरिश्चंद्र इटकर, जनसंपर्क अधिकारी भरत शर्मा, संजय खराटे, सहा. कर अधिक्षक नंदिनी दामोदर, शिक्षण विभागाचे अनवार हुसैन, सुशीला सोनोने आदींची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow