'स्काय फोर्स'ची सहा दिवसांत दमदार कमाई ....

Jan 30, 2025 - 12:12
 0  32
'स्काय फोर्स'ची सहा दिवसांत दमदार  कमाई  ....

अक्षय मुख्य भूमिकेत असला तरी या सिनेमात वीर पहारिया देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे, तसंच सारा अली खान आणि निमरत कौर यांच्याही भूमिका आहेत. दमदार ओपनिंगनंतर सिनेमानं बॉक्स ऑफिसवर पकड कायम ठेवली आहे. सहाव्या दिवशीही सिनेमानं चांगली कमाई केली आहे.अक्षय कुमार चा स्काय फोर्स चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसतोय. त्यामुळं अक्षय कुमारच्या करिअरमधला फ्लॉप सिनेमांची साखळी या सिनेमानं मोडली आहे. गेल्या काही वर्षात अक्षय कुमारचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकले नाहीत. करोना लॉकडाऊननंतर त्याचे सात ते आठ सिनेमे प्रदर्शित झाले, पण यातला एकच सिनेमा बऱ्यापैकी हिट ठरला होता. बाकीच्या सिनेमांना प्रेक्षकांना नकार दिला होता. आता स्काय फोर्समुळं फ्लॉपचा टॅग पुसला जाणार आहे.१९६५च्या भारत पाक यु्द्धाच्या सत्य घटनेवर हा सिनेमा बेतला आहे. सिनेमाला समिक्षक तसंच प्रेक्षकांचेही सकारात्मक रिव्ह्यू पाहायला मिळत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow