सीएसएमटी (मुंबई) च्या रेल्वे ब्लॉकचा लाखो प्रवाशांना फटका; १४ गाड्या प्रभावित..!
६ गाड्या दादर रेल्वे स्थानका पर्यंतच धावणार.
४ गाड्या सीएसएमटी रेल्वे स्थानका ऐवजी दादर स्थानका वरून सुटणार.
सीएसएमटी ते नागपूर या मार्गावरील २ गाड्या केवळ नाशिक रेल्वे स्थानका पर्यंतच धावतील तर दोन गाड्या रद्द करण्यात आले आहेत.
________________________
प्रतिक कुऱ्हेकर
दै. जागर मराठी.
मूर्तिजापूर :- मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग तसेच प्लॅटफॉर्म १० आणि ११ चा विस्तार केला जात आहे. त्यामुळे १७ मे ते २ जूनपर्यंत त्या ठिकाणी ब्लॉक घेण्यात आला आहे. त्याचा परिणाम नागपूर-मुंबई या मुख्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मेल, एक्सप्रेस गाडयांनवर होणार आहे. या पार्श्वभूमीवर, नागपूर मार्गे मुंबईला पोहोचणाऱ्या ६ गाड्या दादर रेल्वे स्थानका पर्यंतच धावणार असून, सीएसएमटी वरून सुटणाऱ्या ४ रेल्वे सीएसएमटी ऐवजी दादर स्थानका वरून सोडल्या जातील. या मार्गावरील दोन गाड्या केवळ नाशिक पर्यंतच धावतील, तर दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
या सुपरफास्ट एक्स्प्रेस दादर स्थानका पर्यंतच पोहोचणार- १२८७० हावडा-सीएसएमटी-१७ ते ३१ मेपर्यंत,१२१०६ गोंदिया-सीएसएमटी विदर्भ एक्सप्रेस ३१मे ते १ जूनपर्यंत,१२२९० नागपूर -सीएसएमटी -१ जून १२८६० हावडा-सीएसएमटी गीतांजली एक्सप्रेस ३१मे,०१२४० नागपूर-सीएसएमटी स्पेशल २०,२३,२७ आणि ३० मे या सुपरफास्ट गाड्या दादर स्थानका वरून सुटणार -१२८५९ सीएसएमटी-हवाडा गीतांजली एक्सप्रेस - १ आणि २ जून,१२१०५ सीएसएमटी -गोंदिया विदर्भ एक्सप्रेस १जून,१२८०९ सीएसएमटी-हवाडा मेल -१ जून,०१२३९ सीएसएमटी -नागपूर स्पेशल २०,२३,२७ आणि ३० मे रोजी सेवाग्राम एक्सप्रेस नाशिक पर्यंत ३१ मे आणि १ जूनला १२१४० नागपूर- सीएसएमटी सेवाग्राम सुपरफास्ट एक्सप्रेस नाशिक पर्यंतच प्रवास करेल. परतीची १२१३९ सीएसएमटी- नागपूर सेवाग्राम सुपरफास्ट एक्सप्रेस १,२ जूनला मुंबई ऐवजी नाशिक वरूनच सुटेल.
---------------------------------
३१ मे रोजीची १२२९० नागपूर-सीएसएमटी दुरंतो व १२२६२ हावडा-सीएसएमटी, १ जूनची १२२८९ सीएसएमटी-नागपूर दुरंतो आणि २ जूनची १२२६१ सीएसएमटी-हावडा रद्द करण्यात आली आहे.
What's Your Reaction?