साईंच्या दर्शनानंतर सोनू सूदचा मोठा निर्णय, "फतेह" चित्रपटातून मिळणारा नफा करणार दान...

Jan 7, 2025 - 16:01
 0  32
साईंच्या दर्शनानंतर सोनू सूदचा मोठा निर्णय, "फतेह" चित्रपटातून मिळणारा नफा करणार दान...

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यानं आज सहपरिवार शिर्डी इथं साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला हजेरी लावत दर्शन घेतलं. सोनू याचा फतेह हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून चित्रपटाच्या यशस्वीतेसाठी सोनू सूद यानं साईचरणी प्रार्थना केली आहे.

अभिनेता सोनू सूद हा निस्सीम साईभक्त असून तो गेल्या २२ वर्षांपासून शिर्डीत साई दर्शनाला येत असतो.आज नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर तसंच आगामी चित्रपटाच्या यशासाठी सोनू सूद शिर्डीत साई दरबारी आला होता. मध्यान्ह आरतीला हजेरी लावत त्यानं आगामी १० जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या फतेह चित्रपटाच्या यशस्वीतेसाठी प्रार्थना केली. यावेळी सोनू यानं फतेह नाव

दरम्यान, सोनू सूदच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर त्यानं आजवर अनेक चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका साकारल्या आहेत. १९९९ मध्ये कल्लाझागर या चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती, त्यानंतर सोनू सूद यानं कहां हो तुम, मिशन मुंबई, युवा, आशिक बनाया आपने यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

सोनू सूदनं हिंदी सिनेमांव्यतिरिक्त तेलुगू, तामिळ आणि कन्नड इंडस्ट्रीमध्येही अभिनय केला आहे. सोनू सूद मुंबईत आला तेव्हा त्याच्या खिशात फक्त ५५०० रुपये होते. लिहिलेला काळ्या रंगाचा टी शर्ट देखील परिधान केलेला होता. असे जीवनात संघर्ष करत त्यांनी चित्रपट क्षेत्रात यश मिळवलंय.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow