श्री संत तुकाराम महाराज कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची अंबाबरवा वन्यजीव अभयारण्यास भेट!!
दैनिक जागर मराठी
अकोट (ता. प्र.) : श्री संत तुकाराम महाराज कनिष्ठ महाविघालय किनखेड (पूर्णा) ता. अकोट यांच्या वतीने एक दिवसीय शैक्षणिक क्षेत्र भेट उपक्रमाचे आयोजन मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत अंबाबरवा वन्य जीव अभयारण्य (वसाडी) ता.संग्रामपुर जि बुलढ़ाणा येथे अभ्यास भेट देण्यात आली. प्रथम श्री क्षेत्र वारी हनुमान येथील विस्तीर्ण हनुमान सागर प्रकल्पास भेट देण्यात आली. तेथील जैव विविधतेची माहिती विदार्थाना देण्यात आली त्यानंतर वनभोजन घेण्यात आहे. त्यानंतर अंबाबरवा अभयारण्यात भेट देण्यात आली. यावेळी अभयारण्या द्वारे उपलब्ध जिप्सी मोटार वाहना द्वारे विस्तीर्ण अभयारण्याची जंगल सफारी करण्यात आली. अभयारण्यातील जैवविविधता, वनस्पती, प्राणी, औषधीय वनस्पती, नैसर्गिक वन्य जिवांचा अधिवास, पाण्यातील जैवविविधता तसेच या परिसरातील विस्तीर्ण जलाशय इत्यादि विषयी सखोल माहिती अभयारण्य मार्गदर्शकाच्या माध्यमातून विदार्थाना देण्यात आली. विवीध नैसर्गिक बाबीची माहिती विद्यार्थ्यांनी आत्मसात केले मुळे समाधान व्यक्त केले. या शैक्षणिक क्षेत्र भेट उपक्रमा करीता प्राचार्य देवानंद गावंडे, पर्यवेक्षक संतोष वाघ, प्रा. बाळापुरे, प्रा. देवर, प्रा. खंडेराव, प्रा. जाभंळे, प्रा.खंडारे, प्रा.देऊळकार, प्रा. खंडारे, प्रा. इंगोले, प्रा. खोले, प्रा. तराळे, जया गावंडे, उमेश पहुरकार, आदि शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. प्रसंगी महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थीत होते.
What's Your Reaction?








