विद्यापीठाचेवतीने जीवनाचे प्रभावी व्यवस्थापन विषयावर कार्यशाळा संपन्न!!

Dec 21, 2025 - 16:31
 0  8
विद्यापीठाचेवतीने जीवनाचे प्रभावी व्यवस्थापन विषयावर कार्यशाळा संपन्न!!

दैनिक जागर मराठी 
मारोती सोनवणे 
अमरावती  : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील स्वामी विवेकानंद अभ्यास केंद्र आणि श्रीरामकृष्ण विवेकानंद समिती, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्याथ्र्यांमध्ये सामाजिक व नैतिक मूल्याची वाढ करण्याच्या दृष्टीने जीवनाचे प्रभावी व्यवस्थापन या महत्वपूर्ण विषयावर नुकतीच एकदिवसीय युवा कार्यशाळा संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. मनिषा कोडापे, श्रीरामकृष्ण मिशन, वडोदरा, गुजरात येथील श्रीमत स्वामी अनंतरानंद, सिम्बॉसिस महाविद्यालय, पुणेचे सेवानिवृत्त विभागप्रमुख डॉ. शिरीष लिमये, स्वामी विवेकानंद अभ्यास केंद्राचे समन्वयक प्रा. योगेश्वर कुरवाडे रामकृष्ण विवेकानंद समितीचे उपाध्यक्ष श्री प्रमोद देशमुख उपस्थित होते. कार्यशाळेच्या प्रथम सत्रात श्रीरामकृष्ण मिशन, वडोदरा, गुजरात येथील श्रीमत स्वामी अनंतरानंद यांनी तुम्हीच तुमच्या भाग्याचे निर्माते आहात या विषयावर, तर दुस-या सत्रात सिम्बॉसिस महाविद्यालय, पुणेचे सेवानिवृत्त विभागप्रमुख डॉ. शिरीष लिमये यांनी सकारात्मक दृष्टिकोन या विषयाची मांडणी करतांना सकारात्मक दृष्टिकोन, आत्मशिस्त व समाजाप्रती असलेली जबाबदारी यावर विस्तृत मार्गदर्शन केले. संवादात्मक सत्र व मार्गदर्शनामुळे विद्याथ्र्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रश्नोत्तराच्या सत्रात विद्याथ्र्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मान्यवरांनी समर्पक उत्तरे देवून त्याचे महत्व पटवून दिले. शेवटच्या सत्रात कार्यशाळेमध्ये सहभाग नोंदविल्यााद्दल उपस्थित विद्याथ्र्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.  कार्यशाळेत स्वामी विवेकानंद व रामकृष्ण परमहंस यांच्या जीवनदर्शनाच्या आदर्श विचारांचा विशेष संदर्भ देण्यात आला. कार्यशाळेची सुरुवात ओम सहनाववतु, सहनौ भुनक्तु या मंगल प्रार्थनेने करण्यात आली. प्रास्ताविकतेतून स्वामी विवेकानंद अभ्यास केंद्राचे समन्वयक प्रा. योगेश्वर कुरवाडे व रामकृष्ण विवेकानंद समितीचे उपाध्यक्ष प्रमोद देशमुख यांनी युवा कार्यशाळेमागील भूमिका विषद केली. संचालन दुर्गेश शिवणकर, तर आभार प्रा. श्रीकांत रासेकर यांनी मानले. शांतीपाठाने कार्यशाळेचा समारोप झाला. कार्यशाळेला 
मोठ्या  संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow