विकास हिंदी विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची नागपूर येथील प्रसिद्ध स्थळांना भेट !!
दैनिक जागर मराठी
सोहेल खान
पांढरकवडा (ता. प्र.) : येथील विकास हिंदी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच नागपूर येथील प्रसिद्ध स्थळांना शैक्षणिक भेट दिली. या सहलीचे आयोजन विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर घालण्यासाठी आणि प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी करण्यात आले होते. संस्थेचे सचिव आनंद वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्याध्यापिका अनुश्री वैद्य यांच्या नेतृत्वाखाली ही सहल यशस्वीरित्या पार पडली. विद्यार्थ्यांनी नागपूरमधील ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी देऊन माहिती मिळवली. सहलीच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
What's Your Reaction?








