वंचितच्या अभिवादन रॅलीचा उडाला फज्जा ; अल्प प्रतिसादामुळे पक्षावर नामुष्की..

Sep 24, 2024 - 15:57
 1  396
वंचितच्या अभिवादन रॅलीचा उडाला फज्जा ; अल्प प्रतिसादामुळे पक्षावर नामुष्की..

प्रतिनिधी, कंधार 

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले यांना लोहा विधानसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे रविवारी, २२ सप्टेंबर रोजी कंधार शहरात अभिवादन रॅली काढण्यात आली. मात्र अल्प प्रतिसादामुळे रॅलीचा फज्जा उडाला असून पक्षावर नामुष्की ओढवली आहे. 

    लोहा विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीसाठी माजी जि.प.सदस्य चंद्रसेन पाटील, ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.संजय पवार हे इच्छुक होते. सर्व ओबीसी व बहुजन समाजातील कार्यकर्त्यांना ताकतीने निवडणूक लढणारा सक्षम उमेदवार देणे अपेक्षित होते. यासाठी कार्यकर्ते उमेदवारीसाठी चंद्रसेन पाटील व संजय पवार यांच्या पाठीशी उभे होते.

      परंतु पक्षाने शिवा नरंगले यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा पारंपरिक मतदार, तसेच ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात नाराज झाल्याचे दिसून येते आहे. यातूनच रविवारी, २२ सप्टेंबर रोजीच्या अभिवादन रॅलीकडे मतदारांनी पाठ फिरवली. रॅलीत मोजकेच लोक हजर होते. रॅलीला मिळालेल्या अल्प प्रतिसादामुळे पक्षावर नामुष्की ओढवली आहे. 

-----------------------

चंद्रसेन पाटील यांच्याबद्दल मतदारांमध्ये सहानुभूती

लोहा विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून चंद्रसेन पाटील इच्छुक उमेदवार होते. त्यांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते होते. माळाकोळी येथे अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचे यशस्वी नियोजन, ओबीसी म्होरक्या प्रा.लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्या सभेचे आयोजन यामुळे गावोगावी मतदारांमध्ये त्यांच्या नावाची चर्चा होती. मात्र उमेदवारी मिळाली नसल्याने कार्यकर्ते नाराज झाले असून चंद्रसेन पाटील यांना भेटून निवडणूक लढण्याची गळ घालत आहेत. उमेदवारी मिळाली नसल्यामुळे त्यांच्याबद्दल मतदारांमध्ये सहानुभूतीची लाट निर्माण झाल्याचे दिसून येते आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow