मोठी बातमी "बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार बोर्डाकडून महत्त्वाची अपडेट.

May 20, 2024 - 18:21
 0  8
मोठी बातमी "बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार बोर्डाकडून महत्त्वाची अपडेट.

अमरावती प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. मंगळवारी 21 मे रोजी दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर केला जाईल, अशी घोषणा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडून करण्यात आली आहे.

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती.बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. बारावीची परीक्षा नऊ विभागीय मंडळातर्फे आयोजित करण्यात आली होती.

 सूचना : मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार उद्या दुपारी जाहीर करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर ,छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर ,अमरावती, नाशिक ,लातूर , व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी- मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळावर मंगळवार दिनांक २१/०५/२०२४ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.

अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे

▪️https://mahresult.nic.in/

▪️https://hscresult.mkcl.org

▪️https://www.mahahsscboard.in

▪️https://results.digilocker.gov.in

▪️https://results.targetpublications.org

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow