मलायकाच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एण्ट्री? RR vs CSK च्या मॅचदरम्यान कुमार संगकारासोबत फोटो व्हायरल, डेटिंगच्या चर्चा !!
मुंबई- मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचा ब्रेकअप होऊन बराच काळ उलटला आहे. सध्या दोघेही सिंगलच आहेत पण लोक मलायकाचे नाव कोणाशी ना कोणाशी तरी जोडत राहतात. आता ती गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये दिसली होती. तिथे ती राजस्थान रॉयल्सचे कोच कुमार संगकारा यांच्यासोबत दिसली. या दोघांना एकत्र पाहून लोकांच्या मनातले विचार वेगवेगळ्या दिशेने धावू लागले. त्यांच्यात नक्की काय आहे असे प्रश्न सध्या विचारले जात आहेत.
आयपीएल २०२५ चा सामना ३० मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. मलायका अरोरा देखील या सामन्याला उपस्थित होती. तिने आरआरची जर्सी परिधान केलेली दिसली. संघाचे क्रिकेट संचालकही तिच्या शेजारी बसले होते, त्यांनीही तिच जर्सी घातली होती. श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू कुमार संगकारा (४७) त्याच्या आयपीएल कारकिर्दीत पंजाब किंग्ज (पूर्वी किंग्ज इलेव्हन पंजाब), डेक्कन चार्जर्स आणि सनरायझर्स हैदराबादकडूनही खेळला आहे.
मलायका अरोराचे कुमार संगकाराशी प्रेमसंबंध?
आता मलायका अरोरा आणि संगकाराला एकत्र पाहून लोकांनी हे दोघे डेट करत आहेत का? अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मलायकाच्या आयुष्यात नवीन प्रेम आले का असे प्रश्न विचारले जात आहे. अभिनेत्रीचे यापूर्वी अनेक पुरुषांशी नाव जोडले गेले आहे आणि आता क्रिकेटपटूशी जोडले जात आहे. एका युजरने लिहिले की, 'मलायका अरोरा कुमार संगकारासोबत बसली आहे. त्यांच्यात काहीतरी शिजत आहे. मला अभिनेत्री आणि आरआर यांच्यात कोणताही संबंध दिसत नाही.
What's Your Reaction?








