भूकंप नव्हे त्सुनामी येणार​! अब्जावधी डॉलर्स पणाला, गुंतवणूकदारांची उडालीये झोप; ​बाजार किती सज्ज?

Apr 1, 2025 - 10:19
 0  31
भूकंप नव्हे त्सुनामी येणार​! अब्जावधी डॉलर्स पणाला, गुंतवणूकदारांची उडालीये झोप; ​बाजार किती सज्ज?

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच मोठा धमाका करणार आहेत. यामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये खळबळ उडण्याची शक्यता आहे. देशांतर्गत उद्योगांना वाचवण्यासाठी ट्रम्प काही नवीन टॅरिफ (शुल्क) जारी करू शकतात, ज्यामुळे व्यापाराबाबत देशांमधील आधीच सुरू असलेला संघर्ष आणखी वाढू शकतो. २ एप्रिलपासून परस्पर शुल्क लागू होणार आहेत, आणि भारतीय बाजारासाठी ही मोठी बातमी आहे. ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतरचा हा सर्वात मोठा बदल असू शकतो, ज्याचा परिणाम भारतावरही होण्याची शक्यता आहे.

चीननंतर अमेरिका भारताचा दुसरा मोठा बिझनेस पार्टनर आहे त्यामुळे, अमेरिकेने भारतीय वस्तूंवर कर वाढवले तर त्याचा परिणाम भारतावर होईल. यामुळे बाजारावर होणारा परिणाम अल्पकालीन असेल की काही उद्योगांमध्ये कायमचा बदल घडवून आणेल हे स्पष्ट होईल. पण, सर्वात मोठा प्रश्न आहे की: बाजाराला आधीच अपेक्षित होते का, की यावर अचानक मोठी प्रतिक्रिया येईल?

परस्पर शुल्काचा भारतीय बाजारावर काय होणार परिणाम
ट्रम्प जो नवीन कर लादणार आहेत, तो अमेरिकेपेक्षा जास्त वस्तू विकणाऱ्या देशांशी, व्यापार संतुलित करण्याच्या दिशेकडे यूएस सरकारचे एक पाऊल आहे. ट्रम्प यांच्या प्लॅनबद्दल अद्याप संपूर्ण माहिती उपलब्ध नाही पण, हे कर आधीच लादलेल्या करांव्यतिरिक्त असतील की नाही याकडे लोकांचे लक्ष लागून असले. या योजनेचा उद्देश बाहेरून अमेरिकेत येणाऱ्या वस्तूंवर जास्त कर आकारण्याचा आहे, ज्यामुळे वस्तू महाग होतील आणि लोक त्यांच्या देशात बनवलेल्या वस्तू अधिक खरेदी करतील.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow