फिक्स्ड डिपॉझिटवर TDS वाचवणं एकदम सोप्पं, जाणून घ्या कसं; काय सांगतो प्राप्तिकर खात्याचा नियम !!
नवी दिल्ली : प्राप्तिकर विभागाच्या (आयकर कायदा) कर स्लॅबनुसार दरवर्षी लोकांना आयकर भरणारे अनिवार्य आहे. नियमानुसार लोकांसाठी कर मोजला जातो. निर्धारित वेळेत कर भरला नाही तर प्राप्तिकर विभागाकडून नोटीस पाठवली जाते. याशिवाय पगार, बँक ठेवींवरील व्याज उत्पन्न आणि भाडे यावर टीडीएस (टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स) कापला जातो. आजच्या काळात गुंतवणुकीचे अनेक पर्याय असले तरी लोकांचा मुदत ठेवींवर खूप विश्वास आहे. म्हणूनच आजही बहुतेक लोक FD मध्ये निश्चित गुंतवणूक करतात. एफडी ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते तसेच, गुंतवणूकदारांना हमी परतावा मिळतो. पण FD मधून मिळणाऱ्या उत्पन्नावर आयकर आकारला जातो.होय, मुदत ठेवींवरील व्याजाद्वारे मिळणारे उत्पन्न विहित मर्यादेपेक्षा जास्त असल्यास बँका टीडीएस कापतात पण, तुम्ही TDS कपात थांबवू शकता. यासाठी दोन प्रकारचे फॉर्म - फॉर्म 15G आणि 15H - वापरले जातात. आता हे फॉर्म कधी आणि कसे वापरले जातात जाणून घेऊया.
प्राप्तिकर नियमांनुसार, ज्येष्ठ नागरिक वगळता इतरांना FD वर व्याजाद्वारे मिळणारे उत्पन्न वार्षिक ४०,००० रुपयांपेक्षा जास्त असल्यास TDS कापला जातो. तर, ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा ५०,००० रुपये आहे. टीडीएस व्यक्तीच्या एकूण उत्पन्नात जोडला जातो आणि त्यानंतर त्यावर कर स्लॅबनुसार कर आकारला जातो पण एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी असेल तर त्याला फॉर्म 15G व 15H भरून बँकेत जमा करावे लागेल आणि टीडीएस न कापण्याची विनंती करावी लागेल.
What's Your Reaction?








