पैलपाडा येथील भूमिपुत्र पोलीस हवालदार ओमप्रकाश जामनिक यांना राज्यपाल रमेश बैस यांनी राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक देऊन केले सन्मानित
अकोला - पोलीस हवालदार ओमप्रकश जामनिक हे गोंदिया जिल्यात नेमणुकीस असताना गोंदिया जिल्हातील नक्षलग्रस्त भागात काम करीत असतांना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नक्षल भागात उल्लेखनीय व मोलाची कामगिरी पार पाडली. नक्षल विरोधी अभियान राबवितांना झालेल्या चकमकीत शौर्य पूर्ण कामगिरी बजावली . त्याच्या कामगीरी ची दखल घेऊन भारत सरकारने सन 2021 च्या स्वत्र्यदिनी त्यांना पोलीस शौर्य पदक घोषित केले होते .
दिनांक 6/6/2024 रोजी महाराष्ट्र शासना कडून आयोजित कार्यक्रमात राज्यपाल यांचे हस्ते दरबार हॉल राजभवन मुबई येथे त्याचा सन्मान करून सदरचे पोलीस शौर्य पदक प्रदान करण्यात आले असून यावेळी त्याचे कुटूंबिय सुद्धा हजर होते तसेच महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला , व इतर सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी सुद्धा पोलीस हवालदार जामनिक यांना सन्मानीत केले आहे .
ओमप्रकाश जामनिक पैलपाडा गाव चे रहिवाशी असून मागील वर्षी त्यांची गोंदिया जिल्यातून अकोला येथे बदली झाली असून सद्य पोलीस अधीक्षक कार्यालय अकोला , येथे नक्षल विरोधी कक्ष या ठिकाणी कर्तव्य वाजवीत आहेत . प्रदान करण्यात आलेल्या पोलीस शौर्य पदकाच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे
What's Your Reaction?