पाण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन ... उपसरपंचासह सदस्यांचे आंदोलन .. १७ दिवसांआड़ होतो पाणी पुरवठा !!
अकोट प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील मुंडगाव हे सर्वात मोठे गाव असून या गावाची लोकसंख्या विचारात घेता गावात दररोज किंवा दोन दिवसा आड पाणी पुरवठा झाला पाहिजे परंतु तसे न होता पाणी पुरवठा १७ दिवसां आड होत असल्यामुळे ग्रामस्थांचे पाण्याअभावी भरपुर हाल होत.असून पाणी प्रश्न सुटत नसल्याने उपसरपंचासह सदस्याने दि.१९ रविवार ला आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या कार्यालय जवळील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.गावात १७ दिवसांआड़ पाणी पुरवठा होत असल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. सबंधित विभागाला सांगून देखील कुठलीही दखल घेतली गेली नाही.अनेकदा ग्रामपंचायतच्या वतीने जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी कर्मचाऱ्यां जवळ समस्या मांडल्या गेल्या त्यानंतरही पाणी पुरवठाचा प्रश्न काही सुटला नाही.अखेर ग्रा.प.उपसरपंच तुषार पाचकोरच्या नेतृत्वात पाण्याच्या टाकीवर चढ़त शोले स्टाईल आंदोलन केले.
जोपर्यंत संबंधित विभागाचे अधिकारी आमचा प्रश्न निकाली काढ़ण्याचे आश्वासत देत नाही; तोपर्यत आंदोलन सुरूच राहणार दरम्यान गावात दोन पाण्याच्या टाकी आहेत. मुंडगावातील पाण्याची टाकी प्रेशर अभावी अद्यापही पूर्णपणे भरल्या जात नाही. संबंधित अधिकाऱ्यांना या संदर्भात सांगितलं असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली असे असल्याचे उपसरपंच तुषार पाचकोर व सदस्य अजीज अहमद यांनी म्हटले. पाण्यासाठी केलेल्या या आंदोलनामुळे कोणावर काय कार्यवाही होते, याकडे तालुक्यातील सामान्य नागरिकांचे लक्ष वेधले गेले आहे.
What's Your Reaction?