परतवाडा वरून तुकईथड जाणाऱ्या बसचा अपघात

Mar 24, 2024 - 08:58
Mar 24, 2024 - 09:07
 0  584
परतवाडा वरून तुकईथड जाणाऱ्या बसचा अपघात

 प्रतिनिधी/श्रीकांत नाथे

अमरावती : परतवाडा वरून तुकईथड जाणाऱ्या बसचा भीषण अपघात आज दि.२४ रोजी दुपारी १२ ते १ च्या दरम्यान झाल्याची घटना समोर आली आहे.तर हा अपघात सिमाडोह-घटांग मार्गावर झाला असून या अपघातात एकाचा मृत्यू तर गंभीर प्रवाशांची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

  मानवविकास परिवहन महामंडळाची ९४७९ क्रमांकाची ही बस परतवाडा वरून तुकईथड कडे जात असताना सिमाडोह-घटांग मार्गावर हा अपघात झाल्याची घटना समोर आली असून तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाल्याची माहिती मिळाली तर या बस मध्ये परिवहन कर्मचारी चालक मनोज पाखरे तर वाहक आसोलकर असल्याचे समजले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow