न बघता शॉट मारला अन् आउट झाला, राशिदचा नो लूक शॉट आणि यशस्वीने पकडला भन्नाट कॅच !!

Apr 10, 2025 - 10:10
 0  46
न बघता शॉट मारला अन् आउट झाला, राशिदचा नो लूक शॉट आणि यशस्वीने पकडला भन्नाट कॅच !!

अहमदाबाद: राजस्थान रॉयल्सविरुद्ध गुजरात टायटन्सविरुद्ध सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात राजस्थानने नाणेफेक गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना २१७ धावा केल्या. या सामन्यात एका कॅचने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या सामन्याच यशस्वी जयस्वालने एक अतिशय सुंदर कॅच घेतला.

टीम इंडिया आणि राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वालने गुजरात टायटन्सविरुद्ध रशीद खानचा शानदार कॅच घेतला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये यशस्वीच्या झेलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रशीद खानने दोन चेंडूत १० धावा केल्या होत्या. त्याने तुषार देशपांडेला गगनचुंबी षटकार मारला. यानंतर त्याने एक चौकारही मारला. त्यानंतर नो-लूक शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना तो यशस्वी जयस्वालने झेलबाद झाला.

यशस्वी जयस्वालने अप्रतिम झेल घेतला

तुषार देशपांडे गुजरात टायटन्सच्या डावातील १९ वे षटक टाकत होते. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रशीद खानने नो-लूक शॉट खेळला. चेंडू हवेत होता अशा परिस्थितीत, जयस्वालने बॅकवर्ड स्क्वेअर लेगवर डायव्ह करून एक शानदार कॅच घेतला. ४ चेंडूत १२ धावा काढून रशीद खान बाद झाला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow