नालंदा बुद्ध विहार डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे मनुस्मृतीचे दहन!!
दैनिक जागर मराठी
केशव अवचार
हिंगोली (प्रतिनिधी) : सेनगाव शहरांमध्ये नालंदा बुद्ध विहार डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर सेनगाव येथे मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. नालंदा बुद्ध विहार येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वप्रथम दीप प्रज्वलित करून महापुरुषांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्प अर्पण करण्यात आले आणि त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कैलासराव नागरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी ग्रामपंचायत सदस्य भारत वाकळे व नगरसेवक शिलानंद वाकळे हे उपस्थित होते. यावेळी मनुस्मृति दहन करण्यात का आले याविषयी विनोद वाघमारे यांनी आपले विचार मांडताना. 25 डिसेंबर 1927 रोजी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक नाकारणाऱ्या म्हणजेच मनुस्मृती या ग्रंथाचं दहन करण्यात आले. असे विनोद वाघमारे असे म्हणाले व अध्यक्ष भाषणात कैलासराव नागरे यांनी आपले विचार मांडताना ज्या मनुस्मृतीमध्ये स्त्रियांना अतिशय हिन वाईट अशी वागणूक दिल्या जात होती. त्या ग्रंथांमध्ये स्त्रिया बद्दल कोणत्याही प्रकारची माणुसकी नसून स्त्रीला चूल मूल हे सांभाळावे व हीन वागणूक दिली जात होती. यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्याकरता संजय दिलीप वाघमारे व राहुल गवळी, जयपाल खंदारे, बाबासाहेब वाकळे, राहुल वाघमारे, सुभाष भिसे यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुदाम दादा वाघमारे यांनी केले तर शेवटी आभार संजय दिलीप वाघमारे यांनी मानले. कार्यक्रमाला बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या .
What's Your Reaction?








