नववर्षात कळसुबाई शिखरावर ८४ दिव्यांगाची ऊर्जा मोहिम

Jan 11, 2024 - 09:50
 0  26
नववर्षात कळसुबाई शिखरावर ८४ दिव्यांगाची  ऊर्जा मोहिम

अकोल्यातील १२ दिव्यांगाचा सहभाग

 
 जागर मराठी 
प्रतिनीधी/ संतोष मोरे बाळापूर 


बाळापूर:-  उरळ येथील सुनील वानखडे यांनी केले पाचव्यांदा कळसुबाई शिखर चढाई सुनिल वानखडे यांना दिव्यांग ऊर्जा पुरस्कार अकोला शिवुर्जा प्रतिष्ठान दरवर्षी नव वर्षाचे स्वागत राज्यातील दिव्यांगांसाठी कळसुआई शिखर मोहिमेचे आयोजन  करत असतात.यावर्षीच्या मोहिमेत राज्यातील बीड, छत्रपती संभाजी नगर,पुणे,अकोला, मुंबई,ठाणे, सोलापूर,वर्धा, लातूर, हिंगोली,परभणी, धाराशिव,नाशिक इत्यादी जिल्ह्यातील ८४ दिव्यांगांनी सहभाग घेतला ‌.यांमध्ये १६ महिलांचा समावेश होता.शिवुर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी गाडे  यांच्या नेतृत्वाखाली या मोहिमेचे आयोजन करण्यात आले.मोहिमेचे हे सलग बारावे वर्ष असून आतापर्यंत अनेक दिव्यांग बांधवांनी शिवुर्जा प्रतिष्ठान आयोजित या मोहिमेमुळे कळसुबाई  शिखर सर केले. २०२३ या वर्षाच्या शेवटच्या दिवशी दुपारी दोन वाजता दिव्यांगांनी कळसुबाई शिखराकडे कूच केली.छत्रपती शिवरायांचा,कळसुआई मातेच्या नावाचा जयघोष करत वाटेतील मोठमोठे दगड, चिंचोळ्या वाटा,तीव्र चढ उतार,लोखंडी शिडी मार्ग पार करत सायंकाळी सहा वाजता शिखर गाठले.तिथे सर्वांनी रात्रीचे भोजन करून कापडी तंबुत मुक्काम केला.एक जानेवारी रोजी सकाळी लवकर उठून सर्व दिव्यांग शिखर सर केले.उगवता सूर्य व कळसुआई देवीचे दर्शन घेऊन सकाळी नऊ वाजता उतरायला सुरुवात केली.दुपारी एक वाजता माची मंदिरात सर्वांनी दुपारचे जेवण घेतले.दिव्यांग क्षेत्रात अनोखे काम करणाऱ्या बारा दिव्यांगांना  दिव्यांग ऊर्जा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यामध्ये प्रामुख्याने अकोल्यातील उरळ बु या गावचे सुपुत्र सुनील भाऊराव वानखडे व  बाळासाहेब नेरकर यांना प्रतिष्ठित व मानाचा असा शिवूर्जा प्रतिष्ठाण ,छत्रपती संभाजी नगर  कडून दिव्यांग ऊर्जा पुरस्कार २०२३  देण्यात आला. नंतर सर्व सहभागींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.बारी गावातील मारोती मंदिरात मोहिमेची सांगता करण्यात आली.धडधाकट लोकांनाही धडकी भरावी,अशी दिव्य कामगिरी केल्याचे समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर होते.या मोहिमेत अकोला येथून शिवूर्जा प्रतिष्ठाण समन्वय , दुर्ग प्रेमी, तथा कळसुबाई शिखर ५ वेळा सर करणारे सुनील वानखडे यांच्यासह, संदीप चव्हाण, हरिदास पाचपोर,सुरेश फाळके ,नम्रता चामते, सागर इंगळे, रूपेश जाधव, गजानन रोकडे,रवींद्र भवाने,कार्तिक सूर्यवंशी, बाळासाहेब नेरकर व गजानन निंबोकार यांनी सक्रीय सहभाग घेतला. अकोला येथील अनेक मान्यवरांनी कळसुबाई शिखर वीरांचे विशेष अभिनंदन व स्वागत केले.मोहीम यशस्वीतेसाठी शिवाजी गाडे, कचरू चांभारे,सुनिल वानखडे,सागर बोडखे, जगन्नाथ चौरै, मच्छिंद्र थोरात,जीवन टोपे,अंजली प्रधान, ,लक्ष्मण वाघे ,उमेश खापरे, कल्याण घोलप,अनिता जंबे यांनी विशेष परिश्रम घेतले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow