दारुच्या नशेत धुंद स्वरा भास्करने भर पार्टीत शाहरुखशी केलेली फ्लर्टींग, त्यानंतर किंग खानने !!

Apr 9, 2025 - 09:37
 0  30
दारुच्या नशेत धुंद स्वरा भास्करने भर पार्टीत शाहरुखशी केलेली फ्लर्टींग, त्यानंतर किंग खानने !!

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करला कोणत्याही इतर ओळखीची गरज नाही. ती तिच्या अभिनयापेक्षा तिच्या विधानांमुळेच जास्त चर्चेत असते. तिच्या खळबळजनक वक्तव्यांमुळे आणि स्पष्टवक्त्यांच्या स्टाइलमुळे स्वरा बरेचदा वादाच्या भोवऱ्यात अडकते; ती सोशल मीडियावरही उघडपणे तिचे विचार व्यक्त करते.

Bollywood अभिनेत्री स्वरा भास्कर आज ०९ एप्रिल रोजी तिचा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्त तिने, एका मुलाखतीदरम्यान शाहरुख खानशी संबंधित एक खुलासा करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते तो किस्सा जाणून घेऊ. तिने सांगितले होते की ती एकदा एका पार्टीत इतकी दारू पिऊन गेली होती की तिने सर्वांसमोर शाहरुख खानसोबत फ्लर्ट करायला सुरुवात केली होती.

स्वरा पार्टीत क्रॉप टॉप घालून पोहोचली.

स्वराला रुद्राणी चॅटर्जीच्या चॅट शोमध्ये आनंद एल राय यांच्या वाढदिवसाच्या पार्टीचा फोटो दाखवण्यात आला होता. यामध्ये ती शाहरुख खानसोबत होती. स्वराने याबद्दल सांगितले होते की ती या पार्टीत क्रॉप टॉप घालून गेली होती. कारण त्यावेळी ती परिपूर्ण फिगर मेंटेन आणि स्लिम होती, परंतु या पार्टीत तिने जे काही केले त्याबद्दल तिला खूप लाज वाटली.

दारू पिऊन शाहरुखशी फ्लर्ट

एका मुलाखतीत, स्वरा भास्करला दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या वाढदिवसाच्या पार्टीचा एक फोटो दाखवण्यात आला, ज्यामध्ये ती शाहरुख खानसोबत दिसली. फोटो पाहिल्यानंतर स्वरा म्हणाली, 'मी या पार्टीला क्रॉप टॉप घालून गेले होते कारण त्यावेळी मी पातळ आणि परिपूर्ण स्थितीत होते.' मी पार्टीत खूप दारू प्यायले होते, तिथे शाहरुखशी फ्लर्ट करत होते. शाहरुख मला त्यावेळी सहन करत राहिला. मी त्याला खूप त्रास दिला पण तो काहीच बोलला नाही. स्वराने सांगितले की, शाहरुखच्या अशा संयमी वागण्यामुळे ती त्याच्यावर खूप प्रभावित झाली होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow