दर्पण दिनानिमित्त युवा उद्योजक भागवत लोकमनवार च्या वतीने सर्व पत्रकारांचा सन्मान
त्रकार हे समाजाला आरसा आहे. शासन, प्रशासन आणि समाज यातील महत्वाचा दुवा हा पत्रकार असतो, त्यामुळे समाजात या घटकाचे अनन्यसाधारण महत्व आहे. ते खऱ्या अर्थाने सत्कारास पात्र आहे. असे प्रतिपादन कासरराळीचे युवा उद्योजक व मनोहर पेट्रोल पंप चे मालक भागवत लोक मनोहरमंगरूळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
जागतिक पत्रकार दिनाचे औचित्य साधुन बिलोली बोधन रोड येथील मनोहर पेट्रोलचे मालक भागवत लोकमनवार यांनी बिलोली तालुक्यातील सर्वच पत्रकार व इलेक्ट्रानिक विभागाचे प्रतिनिधींचा सन्मान व सत्कार करण्यात आला. यावेळी जेष्ठ पत्रकार भीमराव बुडूरकर प्रकाश पोवाडे .रत्नाकर जाधव. राजेंद्र कांबळे .राजू पाटील पिंपळकर. माधव एडके.सतीश बळवंतकर. संदीप गायकवाड. शिवराज गायकवाड. गंगाधर कुडके. साईनाथ शिरोळे. संजय संजय पोवाडे सुनील कदम वलियोदिन फारूकि. शेख फारुख अहमद. सय्यद रियाज. बसवंत मुंडकर तसेच इतर पत्रकारांचा यावेळी सत्कार व सन्मान करण्यात आला. पत्रकार बांधवांनी सुद्धा सुंदररित्या आयोजन केलेल्या या कार्यक्रमासाठी मनोहर पेट्रोलचे भागवत लोकमवार यांचे आभार मानले.व नव्याने सुरू होणाऱ्या मनोहर पेट्रोल पंपाच्या भागवत लोकमनवार यांना शुभेच्छा दिल्या.
What's Your Reaction?