तळकोकणात प्रवासाची चिंता सोडा, ‘येताव’ ॲपवर रिक्षा सेवेत; फक्त डाऊनलोड करायचं आणि !!

Apr 10, 2025 - 09:48
 0  24
तळकोकणात प्रवासाची चिंता सोडा, ‘येताव’ ॲपवर रिक्षा सेवेत; फक्त डाऊनलोड करायचं आणि !!

रत्नागिरी : तळकोकणात फिरण्याचा विचार असाल, तर तुमची प्रवासाची चिंता आता मिटणार आहे. तुम्ही ट्रेन किंवा एसटी बसने मालवण, कुडाळ, देवगड येथे उतरल्यावर आता तुम्हाला प्रवासासाठी रिक्षा शोधत बसण्याची आवश्यकता नाही. ‘येताव’ या ॲपद्वारे रिक्षा तुमच्या सेवेत हजर असेल.

ही अभिनव संकल्पना असलेल्या ॲपचा उपयोग पर्यटकांनाच नव्हे, तर स्थानिकांनाही होणार आहे. याच संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे नितीन वाळके यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिली.या ॲपद्वारे आत्तापर्यंत २०० ते २५० रिक्षा चालकांनी नोंदणी केली आहे. मालवणमध्ये दोन दिवसांपूर्वी पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या हस्ते ॲपचे लोकार्पण करण्यात आले. तसेच बुधवारी देवगड येथेही या ॲपचा लोकार्पण सोहळा झाल्याची माहिती त्यांनी दिली.

हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणाहून रिक्षा हवी आहे त्या परिसरात जे रिक्षाचालक उपलब्ध असतील त्या सर्वांचे नंबर उपलब्ध होतील. अन्य वाहनचालकांनी ॲपवर नोंदणी केल्यास त्यांचेही नंबर इच्छुक प्रवाशांसाठी उपलब्ध होतील, अशी माहिती नितीन वाळके यांनी दिली.ही सेवा सिंधुदुर्गातील इतर तालुक्यांसाठी उपलब्ध होणार आहे. पर्यटकांना व प्रवाशांना याचा फायदा होत असल्याची प्रतिक्रिया मालवण येथील पर्यटन व्यावसायिक विशाल गोवेकर व संगीता जोशी यांनी दिली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow