तनिषा भिसेच्या कुटुंबियांनी एकनाथ शिंदेंची आर्थिक मदत नाकारली, ५ लाखांची रक्कम घेण्यास नकार !!
पुणे : पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. मृत गर्भवती महिला तनिशा भिसे यांच्या कुटुंबियांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आर्थिक मदत नाकारली आहे. सुशांत भिसे यांनी ही रक्कम नाकारली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गर्भवती महिलेच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली होती. मात्र ती मदत भिसे कुटुंबियांनी नाकारली आहे. याआधीही भिसे कुटुंबियांना चंद्रकांत पाटील यांनी एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली होती. पण ती देखील भिसे कुटुंबियांनी नाकारली होती.एकनाथ शिंदेंच्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेश चिवटे यांनी भिसे कुटुंबाची भेट घेतली. त्यांनी या कुटुंबाला ५ लाखांची आर्थिक मदत म्हणून पाच लाख रुपये देण्यात येत होते. पण ते भिसे कुटुंबियांनी नाकारले. ही आर्थिक मदत नाकारत त्यांनी आम्हाला पैसे नको, पण दिनानाथ रुग्णालयातील चुकीच्या लोकांवर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली. तसंच यापुढे कधीही अशा घटना घडू नयेत, यासाठी प्रयत्न करा अशी विनंतीही गर्भवती महिलेच्या कुटुंबियांनी केली आहे.
What's Your Reaction?








