टिळक चौक येथे श्री शनी महाराज जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

प्रतिनिधी संतोष वाघमारे
धामणगाव रेल्वे
टिळक चौक धामणगाव रेल्वे येथे श्री शनि महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .धामणगाव शहरात टिळक चौक येथे पुरातन श्री शनि महाराजांचा मंदिर आहे .या मंदिरामध्ये दर शनिवारला हजारोच्या संख्येत भक्तगण दर्शनाकरिता येतात .दिनांक 6 जून 2024 गुरुवार रोजी सर्वत्र श्री शनि महाराजांचा जन्मोत्सव साजरा होत असून ,टिळक चौक येथे श्री शनि महाराजांच्या मंदिरामध्ये जन्मोत्सवाची तयारी करण्यात आली .मंदिराला रंगरंगोटी व रोषणाईने मंदिर सजविण्यात आले होते. सकाळ पासूनच भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. संध्याकाळी 4 वाजता श्री शनि महाराजांचा अभिषेक पूजन करण्यात आले .पूजनानंतर आरती व भक्तांसाठी प्रसादाचे वितरण करण्यात आले .शुक्रवारला सायंकाळी सात वाजता श्री शनि महाराज मंदिर टिळक चौक येथे भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व श्री शनि महाराज भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
What's Your Reaction?






