ज्ञान नर्मदा ने केले माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

Jan 17, 2024 - 07:54
 0  135
ज्ञान नर्मदा ने केले माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन
ज्ञान नर्मदा ने केले माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

मुर्तीजापुर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समाज कार्यात अग्रेसर  ज्ञान नर्मदा बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ सुनीता विष्णू लोडम यांच्या पुढाकाराने हॅपी वुमन्स क्लबच्या सहकार्याने दरवर्षी प्रमाणे राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद जयंती महोत्सवाचे अवचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या कर्तुत्ववान मातृशक्तींचा व युवकांचा सन्मान करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष एड.राधिका तिडके प्रमुख अतिथी मराठा सेवा संघाचे प्रा. प्रमोद ठाकरे प्रा.अमिता तिडके समाजसेवक रवि राठी,इस्त्रो शास्त्रज्ञ माधवी ठाकरे यांच्या मातोश्री अरुणा फुके,उज्वला बोळे,कविता साखरे,मुख्याध्यापक अविनाश बांबल,शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष अरविंद तायडे,समाजसेवक चंदन अग्रवाल,ज्येष्ठ पत्रकार प्रा.अविनाश बेलाडकर,प्रा.एल डी सरोदे,सामाजिक कार्यकर्ते विष्णू लोडम आदींच्या हस्ते राजमाता माँसाहेब जिजाऊ युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी अनिल ठोकळ यांनी बहारदार सामाजिक भजन सादर केले.प्रास्ताविकामध्ये विष्णू लोडम यांनी ज्ञान नर्मदा संस्थेने केलेल्या सामाजिक कार्याचा आलेख मांडला.कर्तुत्ववान मातृशक्ती सन्मानामध्ये एड. राधिका तिडके डॉ. स्वाती पोटे सौअरुणा फुके कबड्डी खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या कु. कल्याणी मेहर,आदर्श शिक्षिका सौ.कल्पना जयसिंग तिडके इत्यादी महिलांचा सत्कार शाल पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन करण्यात आला.ग्राम कानडी येथील कु.यशस्वी चंद्रकिशोर गावंडे हिने आपल्या वक्तृत्व शैलीतून साक्षात जिजाऊ मातेचे दर्शन घडविले.यानंतर युवकांचे सन्मानामध्ये तिरळे पाटील संघटनेचे पप्पू तिडके,प्रभाकर वहीले,अनिल गावंडे,अविनाश बांबल पत्रकारिता क्षेत्रात राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त प्रा.एल डी सरोदे व समाजभूषण पुरस्कार प्राप्त संदीप जळमकर विजयराव फुके यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला.आपल्या सत्काराला उत्तर देताना ज्येष्ठ पत्रकार एल डी सरोदे यांनी ज्ञान नर्मदा संस्थेच्या वतीने झालेले शेकडो सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असून अशा समाजभिमुख संस्थेला समाजामधून बळ देण्याचे  आवाहन केले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रथमेश वरठी,मनोज वानखडे,अतुल गावंडे,आनंद पवार, रवी मार्कंड व हॅपी वुमन्स क्लबच्या सोनल बांगड,दिपाली देशमुख, प्रगती देवके,मेघा दोषी, सुवर्णा लोडम,प्रा.मनीषा यादव,प्रा.मीना भाकरे,प्रा.राजकन्या खणखने,अंकिता सोनेकर,कुंजलता देशमुख,वनिता गावंडे,मंजू टापरे इत्यादी महिलांनी परिश्रम घेतले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow