गुन्हेगारांवर आळा घालणाऱ्यांच्या दिव्याखालीच अंधार...!

May 20, 2024 - 03:46
 0  38
गुन्हेगारांवर आळा घालणाऱ्यांच्या दिव्याखालीच अंधार...!

• खदान पोलीस स्टेशन चे ठाणेदार धनंजय सायरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल.

•अकोला जिल्ह्यात पुन्हा आता पोलीस अधिकाऱ्याकडून युवतीचा विनयभंग पोलिसांना झाले तरी काय !

खदान चे ठाणेदार धनंजय सायरे विरुद्ध नागपुरात 

विनयभंगाचा गुन्हा दाखल!

अकोला प्रतिनिधी: शहरातील खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनंजय सायरे यांच्याविरुद्ध नागपुरातील नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकाराने पुन्हा एकदा अकोला पोलिसांवर नामुष्कीची वेळ आली आहे. 

सविस्तर असे की, नागपुरात नंदनवन भागात एक 22 वर्षे युवती यूपीएससीची तयारी करीत आहे. या युवती सोबत धनंजय सायरे यांची ओळख झाली. या ओळखीतून त्यांनी या मुलीस तीन दिवसापूर्वी फोन करून मी अनेकांचे भवितव्य घडविले आहे, तू माझ्या सोबत रहा, मी तुझे ही भविष्य उज्वल करून देण्यासाठी मार्गदर्शन करतो असे म्हटले होते. हा प्रकार सदर युवतीने आपल्या आईस सांगितला होता. त्यानंतर पुन्हा 18 मे रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता नंदनवन भागात धनंजय सायरे हे सदर मुलीचा मोबाईल ट्रेस करून तिच्यापर्यंत पोहोचले. त्या ठिकाणी तिला पुन्हा सोबत राहण्याबाबत विनवण्या करू लागले. मात्र तिने नकार दिल्यावर तिचा हात पकडून तिची छेड काढली. अशा तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी धनंजय सायरे यांच्याविरुद्ध भादवि कलम 354 अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास नंदनवन पोलीस करीत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow