खाजगी बसचा सिमाडोह जवळ भीषण अपघात ; 6 जणांचा जाग्यावरच मृत्यू...!
दै.जागर मराठी
श्रीकांत नाथे
अमरावती (धारणी) : धारणी रोडवरील सिमाडोह जवळ आज दि.23 रोजी सकाळी 8:30 च्या सुमारास एका खाजगी बसचा भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
परतवाडा वरून धारणीकडे जातांना चावला नावाच्या खाजगी बसचा भीषण अपघात झाला.या खाजगी बसमध्ये एकूण 30-35 प्रवासी असल्याचे समजले तर झालेल्या अपघातात 6 प्रवाशांचा जाग्यावरच मृत्यू झाला.अपघात स्थळी पोलिसांची तुकडी प्रचारण झाली असून अपघातात मृत्यू झालेल्या तसेच गंभीर जखमींना 108 या रुग्णवाहिके द्वारा परतवाडा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
What's Your Reaction?








