काव्या मारनचे १४ कोटी पाण्यासारखे बुडाले, ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास, तोच ठरतोय अपयशी !!
हैद्राबाद : आयपीएल २०२५ चांगलेच रंगात आल्याचे बघायला मिळतंय. प्रेक्षकांमध्ये मोठी क्रेझ आहे. मात्र, सनरायझर्स हैदराबाद संघाची अवस्था यंदा खराब आहे. गेल्या वर्षी अंतिम सामन्यात पोहोचलेला संघ यावेळी ५ पैकी फक्त १ सामना जिंकला आहे. गुणतालिकेत हैद्राबादचा संघ सर्वात खाली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये हैद्राबादची फलंदाजी आतापर्यंत पूर्णपणे अपयशी ठरल्याचे बघायला मिळतंय. एका मागून एक झटके हैद्राबाद संघाला बसताना दिसत आहेत.हैद्राबाद संघाला ज्या खेळाडूवर सर्वात जास्त विश्वास होता, तोच खेळाडू हा अपयशी ठरल्याचे बघायला मिळतंय. सलामीवीर अभिषेक शर्माला चांगली आणि धमाकेदार फलंदाजी जमत नाहीये. पाचही सामन्यात चांगली फलंदाजी करण्यात अभिषेकला यश मिळाले नाही. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात तो लवकर बाद झाला. सनरायझर्स हैदराबादने पॉवरप्लेमध्ये आपले दोन्ही सलामीचे फलंदाज गमावले आणि तिथेच त्यांना मोठा झटका बसला.
अभिषेक शर्माने १६ चेंडूत १८ धावा केल्या. मोहम्मद सिराजने पाचव्या षटकात त्याला बाद केले. पाच सामन्यात त्याने केवळ 51 धावा केल्या. गेल्या वर्षी अभिषेकने 16 सामन्यात 32.26 च्या सरासरीने आणि 204.21 च्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटने 484 धावा केल्या. यंदा मात्र त्याची फलंदाजी प्रभावशाली अजिबातच दिसत नाहीये. मैदानात धावा करण्यासाठी तो संघर्ष करताना दिसतोय. हैद्राबाद संघाला त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा अजूनही आहेत. मात्र, त्याच्या फलंदाजीची लय दिसत नाहीये.
What's Your Reaction?








