ऑक्सीजनमॅन ए.एस. नाथन यांचा स्वस्तिक पॅटर्न राज्यभरात
अकोला जिल्हा प्रतिनिधी
अकोला : दिवसेंदिवस वाढत असलेले तापमान चिंतनाचा विषय असुन तापमान कमी करण्याच्या उद्देशाने ऑक्सीजन आपल्या सर्वांसाठी या संकल्पनेच्या माध्यमातून वृक्ष लागवडीसाठी ऑक्सिजनमॅन एस नाथन यांनी शोधून काढलेला स्वस्तिकपॅटर्न आता अनेक ठिकाणी यशस्वीपणे राबवल्या जात असून अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर यांनी स्वस्तिक पॅटर्न वृक्ष लागवड शोधून काढली याचा श्री गणेशा अकोला जिल्हयातील कापशी येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात ६ जुन २०२२ रोजी करण्यात आला होता. यानंतर अकोला जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रावर स्वस्तिक पॅटर्न साकार करण्यात आला असून हा प्रयोग अनेक ठिकाणी यशस्वी झाला आहे.
लातूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी स्वस्तिक पॅटर्न यशस्वी राबविला गेला असून आता अमरावती
जिल्ह्यात ४ लाख ९८ हजार विद्यार्थ्यांच्या नावाने 'एक विद्यार्थी- एक झाड' या संकल्पनेद्वारे ५ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
यामध्ये 'स्वस्तिक पॅटर्न' वृक्षलागवड महत्त्वाचा टप्पा ठरणार असुन पहिल्या गार्डनचे काम ५ ऑगस्ट पासुन नवसारी परिसरात आकाराला येत असून त्यामध्ये निसर्गसंपदा म्हणून गणल्या जाणाऱ्या झाडशिवाय फळे, फुले व औषधी वनस्पतींचा समावेश असेल. दरम्यान असेच एक गार्डन बडनेरा दोन हजार वृक्ष संपदेसोबतच वॉकिंग ट्रॅक, ओपन जीम, सार्वजनिक सभागृह आदी सोयीही पुरवल्या जात आहेत.स्वस्तिक गार्डनच्या नावातच 'स्वस्तिक' हा शब्द असल्याने तेथे येणाऱ्या प्रत्येकाला समाधान मिळावे, हा त्यामागचा प्रमुख
उद्देश आहे.
// वृक्ष लागवडीचा आधुनिक अकोला पॅटर्न //
१०० फूट लांब व १०० फूट रुंद स्वस्तिक मॉडेल वृक्षलागवडीच्या माध्यमातून एकाचवेळी एक हजार वृक्षाची लागवड करता येते.यामध्ये विवीध २५ प्रकारच्या वृक्ष प्रजातीच्या माध्यमातुन ऑक्सिजन आपल्यासाठी ही संकल्पना ए.एस. नाथन यांना सुचली. पोर्टब्लेअर सारख्या ठिकाणावरून अकोल्यात आलेले व वृक्ष संवर्धनाचा ध्यास घेऊन अखंड कार्य करणारे ए.एस नाथन स्वस्तिक पॅटर्न वृक्ष लागवडीचे जनक आहेत.
//लॉकडाऊन काळाचा असाही उपयोग //
लॉकडाउनच्या काळात नाथन यांनी वेळेचा सदुपयोग करित अकोला ते अकोट ४५ की.मी. रेल्वे ट्रॅकने पायी प्रवास करीत दोन्ही बाजूने २५ ते ३० हजार सीड्स बॉल्स फेकून वृक्षक्रांतीचा संदेश दिला होता.एक विद्यार्थी एक वृक्ष ,एक जन्म एक वृक्ष, यासह विविध उपक्रमांचे संकल्पक म्हणून नावारूपास आलेले आहेत नाथन आज प्रत्येकासाठी प्रेरणा ठरले आहेत.
What's Your Reaction?