आरंभ ऑर्गनायझेशन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन !! माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील;सत्यपाल महाराजांची उपस्थिती

अहेमद शेख/ अकोट
अकोट आरंभ ऑर्गनायझेशन संस्थेच्या अकोट कार्यालयाचे उद्घाटन माजी पालकमंत्री गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, राष्ट्रीय कीर्तनकार सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज, माजी जिल्हा परिषद सभापती राजीव बोचे; आरंभ ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष कॅप्टन सुनील डोबाळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवार दि. ५ जुन रोजी संध्या ७ वा. दिमाखदार कार्यक्रमात उत्साहात पार पडले.
शहरातील पोपटखेड रोड मार्गावरील न्यायालया जवळच्या थोरात कॉम्लेक्स येथे आरंभ ऑर्गनायझेशनच्या संपर्क कार्यालयाचा भव्य दिव्य उद्घाटन कार्यक्रमास शहरातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत नागरिक;युवक,शेतकरी,पत्रकार,व्यापारी, यासह अकोट-तेल्हारा तालुक्यातील सीएनजी प्रकल्पाचे ग्राम प्रमुखांची उपस्थिती लाभली होती.
यावेळी प्रास्ताविक आरंभ ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष कॅप्टन सुनील डोबाळे यांनी केले आपल्या प्रास्ताविकात त्यांनी आरंभ ऑर्गनायझेशन द्वारा आरोग्य, ग्रामसुधार,शेती, पर्यावरण, जलसंधारण शिक्षण आदी क्षेत्रात राबविण्यात येणारे उपक्रम व केलेल्या कार्याबद्दल माहिती दिली. यानंतर उद्घाटक डॉ.रणजीत पाटील यांनी कॅप्टन सुनील डोबाळे यांनी सैन्य सेवेतून केलेल्या राष्ट्र कार्याचा जागर करून आरंभच्या सामाजिक चळवळीस शुभेच्छा दिल्या, राष्ट्रीय कीर्तनकार सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्राम सुधाराचा वसा आरंभने जोपासावा असे मत व्यक्त केले तर माजी सभापती राजू बोचे यांनी आरंभ ऑर्गनायझेशन ने तालुक्यातील भूमिपुत्रांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम चळवळ राबवावी असे मत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. कॅप्टन सुनील डोबाळे यांच्या वाढदिवसानिमित्त यावेळी उपस्थितांनी त्यांचे अभिष्टचिंतन करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. कार्यक्रमाची सांगता हॉटेल अक्षयपात्र येथे स्नेहभोजनाने करण्यात आली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अनंत गावंडे यांनी तर आभार प्रदर्शन माजी उपसरपंच तुषार अढाऊ यांनी केले.
What's Your Reaction?






