‘आनंदी आनंद गडे: इकडे तिकडे चोहीकडे’; अमेरिकेच्या निर्णयाने शेअर बाजार गुले गुलजार, गुंतवणूकदारांची लॉटरी !!

Apr 10, 2025 - 09:55
 0  39
‘आनंदी आनंद गडे: इकडे तिकडे चोहीकडे’; अमेरिकेच्या निर्णयाने शेअर बाजार गुले गुलजार, गुंतवणूकदारांची लॉटरी !!

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची एक घोषणा यूएस शेअर मार्केटच्या पथ्यावर पडली आहे. ट्रम्प यांनी चीन वगळता 75 देशांवरील वाढीव टॅरिफला 90 दिवसांचा पॉज लावला आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ट्रुथ सोशलवर याची घोषणा केली असून यासह त्यांनी चीनवरील परस्पर शुल्क तात्काळ प्रभावाने 125 टक्क्यांपर्यंत वाढवले.यासोबतच ट्रम्प म्हणाले की, ज्या 75 हून अधिक देशांनी अमेरिकेशी व्यापार, शुल्क, चलन फेरफार आणि इतर गैर-मौद्रिक मुद्द्यांवर वाटाघाटी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि ज्यांनी अमेरिकेविरुद्ध कोणतीही सूडाची कारवाई केलेली नाही, त्यांच्यासाठी त्यांनी 90 दिवसांसाठी ‘परस्पर शुल्क’ थांबवले आणि 10% नवीन शुल्क जाहीर केले. हा निर्णय तात्काळ प्रभावाने लागू होईल. ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेकडून हा एक सकारात्मक उपक्रम आहे, जेणेकरून चर्चेचा मार्ग खुला राहील.

नव्या टॅरिफ घोषणेनंतर शेअर बाजारात विक्रमी वाढ
टॅरिफच्या चिंतेमुळे गेल्या काही दिवसांपासून जगभरातील बाजारांना मोठ्या घसरणीला समोरे जावे लागले आहे. अमेरिकन शेअर मार्केटमधूनही लोक बाहेर पडू लागले पण, हळूहळू बाजार सावरला आणि बुधवारी अमेरिकी शेअर मार्केटमध्ये एका दिवसांत तेजीच वादळ आलं. अमेरिकन निर्देशांक डाउ जोन्सने २०२० नंतरचा सर्वात मोठा एकदिवसीय वाढ नोंदवली तर, आशियाई बाजार देखील मोठ्या वाढीसह व्यवहार करत आहेत. त्याचवेळी, गिफ्ट निफ्टी देखील ७५२ अंकांनी वधारला पण, आज महावीर जयंतीनिमित्त भारतीय शेअर बाजार बंद असल्यामुळे देशांतर्गत मार्केटला या संकेतांचा फायदा घेणे शक्य होणार नाही.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow