अवकाळी पावसाचा कहर बिच्छुखेडा येथे वादळी वाऱ्याचा १५ घरांना तडाखा; साहित्याची नासधूस.

May 23, 2024 - 09:27
 0  10
अवकाळी पावसाचा कहर बिच्छुखेडा येथे वादळी वाऱ्याचा १५ घरांना तडाखा; साहित्याची नासधूस.
अवकाळी पावसाचा कहर बिच्छुखेडा येथे वादळी वाऱ्याचा १५ घरांना तडाखा; साहित्याची नासधूस.

चिखलदरा:प्रशांत पंडोले

 मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम

बिच्छुखेडा येथे रविवारी सायंकाळी अचानक मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे १५ पेक्षा अधिक घरे-गुरांच्या गोठ्यांवरील छप्पर उडाले. त्यात आदिवासींच्या सामानाची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली. महसूल विभागाच्या वतीने पंचनामे करण्यात येत आहेत, त्यांना मदतीची मागणी

माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी केली आहे.

अवकाळी पावसाने सर्वत्र कहर केला आहे. केव्हाही कोसळत असल्याने वीज कडाडण्यासह अचानक मुसळधार पाऊस व क्षणातच चक्रीवादळाचा तडाखा देणारा वादळ बारा येत असल्याने मेळघाटातील आदिवासीही हवालदिल झाले आहेत. कुठे ना कुठे त्याचा फटका बसत

असल्याचे चित्र आहे. रविवारी सायंकाळी बिच्छुखेडा येथे वादळ वाऱ्यांसह आलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले.

सुखदेव खुशालजी शानवारे, किशोर पुरखा सावलकर, प्रकाश नाना सावलकर, अरुण मनु शनवारे, शंकर हिरुजी भाकरे आदींच्या घरांचे छप्पर उडण्यासह गुरांच्या गोठ्याचे मोठ्या

प्रमाणात नुकसान झाले आहे. महसूल विभागाच्यावतीने पंचनामे करण्यात येत आहेत. माहिती मिळताच गावाला मेळघाटचे माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी भेट दिली. त्यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य भानू बेठेकर, साबूलाल पाटणकर, उत्तम भुसुम, बाबू बेठेकर, दिलीप उईके, किशन बेठेकर, विशाल भुसुम आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow