अटक करायला आलेले पोलीस, दारु पिऊन पार्टी करुन गेले! बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाचा गौप्यस्फोट !!

Apr 1, 2025 - 09:55
 0  32
अटक करायला आलेले पोलीस, दारु पिऊन पार्टी करुन गेले! बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाचा गौप्यस्फोट !!

मुंबई - प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हल्ली चित्रपटांपेक्षा त्यांच्या स्पष्ट विचारांमुळे जास्त चर्चेत असतात. ट्विटरवर ते अनेकदा अशा गोष्टी पोस्ट करतात ज्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता असते. यामुळे त्यांच्यावर अनेक वेळा गुन्हे दाखल झाले आहेत. 'रंगीला', 'सत्या' आणि 'कंपनी' सारखे सुपरहिट चित्रपट बनवणाऱ्या राम गोपाल वर्मा यांनी आता एका मुलाखतीत एक नवीन आणि खळबळजनक दावा केला आहे. दिग्दर्शकाने सांगितले की, वादग्रस्त ट्विट्सच्या संदर्भात पोलिस एकदा त्यांना अटक करण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये आले होते. पण अधिकाऱ्यांनी त्यांच्यासोबत दारू प्यायली आणि मग निघून गेले.

राम गोपाल वर्मा यांनी 'गेम चेंजर्स'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, '४-५ वर्षांपूर्वी मी काही ट्विट केले होते. मी त्याबद्दल जास्त विचार केला नाही, मला जे वाटले ते मी लिहून टाकले. काही तासांनंतर, महेश भट्ट सरांनी मला फोन केला आणि म्हणाले, रामू, तुझ्या ट्विटवरून गोंधळ उडाला आहे, पण हे समजून घे की ईशनिंदा करणे कायद्याच्या विरोधात नाही. खरे सांगायचे तर, ते कशाबद्दल बोलत आहेत हे मला कळाले नाही कारण मी काय केले होते ते मी विसरून गेलो होतो.

दिग्दर्शकाने पुढे सांगितले की, या प्रकरणात त्यांच्याविरुद्ध सुमारे ६-७ गुन्हे दाखल आहेत. 'आम्ही सर्व ६-७ प्रकरणे एकाच ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करत होतो, पण तोपर्यंत पोलीस माझ्या ऑफिसमध्ये पोहोचले.' दरम्यान, न्यायालयाने तो कायदा रद्द केला होता. आता पोलिसांना काय करावे हे समजत नव्हते, म्हणून ते सर्व माझ्यासोबत बसले, दारू प्यायले आणि मग निघून गेले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow